● उद्या महाराष्ट्र बंद ! फक्त या सेवा असतील सुरु , शरद पवार म्हणाले___११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
महाविकास आघाडीने सोमवार 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.
लखीमपूरमध्ये शेतकरी शांततापुर्वक काळे झेंडे दाखवून आंदोलन करत होते. मात्र, केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन मोठा नरसंहार झाला.
याविरोधात केंद्र सरकारने अद्याप कारवाई केली नाही. शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आणि घटनेचा निषेध म्हणून सोमवारी बंद पुकारला आहे.
येत्या ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे.त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. सोलापूरात राष्ट्रादीचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली.
भाजपच्या हाती सत्ता आहे म्हणून त्यांच्याकडून होणारा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसत आहे. शांततेच्या मार्गाने निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी गाड्या घातल्या आहेत. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्यांना शेतकऱ्यांबद्दल काय आस्था नाही. शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून भाजपा कार्यकर्त्यानी शेतकऱ्यांची हत्या केली आहे.