Type Here to Get Search Results !

जवळार्जुन येथे कोवीशील्डचे विक्रमी लसीकरण

जवळार्जुन येथे कोवीशील्डचे विक्रमी लसीकरण
पुरंदर प्रतिनिधी- सिकंदर नदाफ.
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांच्या माध्यमातून व पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे यांचे सुपुत्र   अजिंक्य टेकवडे यांच्या प्रयत्नातून जवळार्जुन येथे कोवीशील्डचे विक्रमी लसीकरण करण्यात आले आहे.
यावेळी जवळार्जुन परिसर लवकरात लवकर कोरोना मुक्त व्हावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने देखील पुढाकार घेत या ठिकाणच्या वंचित असणाऱ्या सर्वच ग्रामस्थांना  कोवीशील्ड चे  लसीकरण सुरू केले.... दरम्यान या शिबिरात लसीचा  पहिला तसेच दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी देखील सकाळपासूनच  येथील  अस्मिता भवनात  गर्दी केली होती..यावेळी  500 हुन अधिक ग्रामस्थांचे लसीकरण उत्साहात पार पडले असल्याची माहिती देखील स्थानिक प्रशासनाने दिली.  या  कार्यक्रमासाठी बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांसह  जवळार्जुन गावचे सरपंच सोमनाथ कणसे पोलीस पाटील श्रीकांत राणे समुदाय आरोग्य अधिकारी सुमित खिलारे ग्रामपंचायत सदस्य सचिन टेकवडे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत टेकवडे पंकज टेकवडे ओंकार टेकवडे आरोग्य निरीक्षक आबासाहेब राजवाडे तसेच मंदाकिनी यादव मयुरी ठाणेकर आदीं नी विशेष परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test