Type Here to Get Search Results !

CRIME NEWS सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी

सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी 
८ लाख १३ हजार ५०० रू किंमतीचा मुद्देमाल जप्त.

वडाळा येथील डॉक्टरांना खंडणीच्या उददेषाने अपहरण करून लुटलेल्या ०७ आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या ०४ दिवसात मुसक्या आवळण्यात एल.सी.बी.ला यश दिनांक २१/०९/२०२१ रोजी रात्रौ  २०:३० वा. सुमारास यातील फिर्यादी 
डॉ.श्री.अनिल व्यंकटेश कुलकर्णी, वय ४७  व्यवसाय वैद्यकीय सेवा व इंडीयन ऑईल पेट्रोल पंप वडाळा रा.वडाळा ता.उत्तर सोलापूर सध्या रा.५६५ उत्तर कसबा सोलापूर हे त्यांची वेरना गाडी क्रमांक 
एम.एच. 13-बी.एन.-9367 मधून मौजे वडाळा ते सोलापूरकडे जात असताना 
बीबीदारफळ ते कोंडी गावाचे रस्त्याचे दरम्यान एम.आय.डी.सी च्या जवळ असलेल्या क्रॉस रोडवर आलेनंतर अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचे ताब्यातील इनोव्हा गाडी आडवी लावुन फिर्यादी यांना गावंठी बंदुकीचा धाक दाखवुन कोयत्याने उजव्या हाताचे दंडावर, काठी व हॉकी स्टीकने उजव्या पायावर मारहाण करून जखमी करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवुन त्याचे अपहरण करून 
१ कोटीची खंडणीची मागणी करून त्यांना मोहोळ, पंढरपूर, टेंभुर्णी, इंदापुर, बारामती,जेजूरी, सासवड मार्गे वारजे-माळवाडी पुणे येथे नेऊन त्याचे कडील पेट्रोल पंपाची जमा असलेली ५ लाख ७० हजार ४२० रूपये रोख रक्कम तसेच फिर्यादी यांचे खिशातील १८ हजार रूपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ८८ हजार ४२० रू. जबरदस्तीने काढुन घेवून यातील फिर्यादीस वारजे मळेवाडी पुणे येथे ढकलुन दिले आहे म्हणुन वगैरे मजुकरची फिर्यादीवरून  सोलापूर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 771/2021 भारतीय दंड संहिता कलम 395,341,364 (अ)365 व शस्त्र अधिनियम कलम  3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सर्जेराव पाटील व इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. 
भेटी दरम्यान मा. पोलीस अधिक्षक व अप्पर पोलीस अधिक्षक यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. 
त्यानुसार गुन्हे शाखेचे पो.नि. सर्जेराव पाटील यांनी स.पो.नि. रविंद्र मांजरे व त्यांचे पथक नेमुन पथकास यातील फिर्यादीस वारजे माळवाडी पुणे येथे सोडले असून सदर गुन्हयात गांवातील एखादया व्यक्तीचा सहभाग असण्याची दाट शक्यता असून त्या दृश्टिीकोणातून तपास करून गांवातील व पुणे भागातील अशा पध्दतीचे गुन्हे करणा-या गुन्हेगारांची माहिती संकलित करून गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या.
त्याप्रमाणे गुन्हे शाखेकडील स.पो.नि. रविंद्र मांजरे व त्यांचे पथक सदर गुन्हयाचे तपासकामी पुणे शहरात असताना, बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, 
 सदरचा गुन्हा हा वडगांव, सिंहगड रोड, पानमळा पुणे येथील गुन्हेगारांनी केल्याचे माहिती मिळाल्याने ०५ आरोपीतांना पुण्यातुन ताब्यात घेवून त्यांचेकडे स्वतंत्ररित्या विचारपूस करता त्यांचेपैकी ०१ आरोपीने सांगितले की, त्याचा मामाचा मुलगा हा मौजे वडाळा ता. उत्तर सोलापूर येथे राहवयास असून त्यास मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी मोठी असामी असलेल्या व्यक्तीस लुटण्याचे काम बघण्यास सांगितले होते, 
त्याप्रमाणे मामाच्या मुलाने सांगितले की, 
मौजे वडाळा गांवात एक डॉक्टर असून त्यांचा पेट्रोलपंप व दवाखाना आहे, त्यांचेकडे मोठया प्रमाणात पैसे असून ते दररोज पेट्रोल पंम्पातील व दवाखान्यातील जमा झालेली रक्कम त्यांचेकडील वेरना कारमधून सोलापूरला जात असतात त्यांचे किडनॅपिंग केले तर ते आपल्याला एक दोन कोटी रूपये नक्की देईल अशी माहिती सांगितली होती. 
    तेंव्हा मामाचे मुलास लुटण्याचेकाम कधी करावयाचे आहे ते तु मला दोन चार दिवस अगोदर सांग असे आरोपीने सांगितले होते. 
      त्याप्रमाणे वडाळा येथील आरोपीच्या मामाच्या मुलाने नियोजन करून पुण्यातील आरोपीतांना तीन दिवस अगोदर बोलावून घेतल्याने ते सर्वजण इनोव्हा गाडीने सोलापूर शहरात येवुन सोलापुरातील हॉटेल अंम्बेसिडर येथे थांबले होते. दरम्यान आरोपीच्या मामाचा मुलगा व त्याचा एक मित्र असे सदर लॉजमध्ये गुन्हयाचे नियोजन करून दिनांक २१/०९/२०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास डॉक्टर यांना किडण्यापिंग करून लुटण्याचे ठरले. 
दिनांक २१/०९/२०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास ठरल्याप्रमाणे मामाचे मुलाने डॉक्टर गांवातून निघाले असून मी त्यांचे मागे मोटार सायकलवर असल्याचे सांगीतले त्यानंतर आरोपींतांनी डॉक्टरची वेरना गाडीस इनोव्हा गाडीने आडवून डॉक्टरांना त्यांचे कारमधून बाहेर काढून इनोव्हा गाडीमध्ये घातले. तेंव्हा इनोव्हा मधील एका आरोपीने डॉक्टरांची वेरना गाडी ताब्यात घेवून त्यानंतर आरोपींनी डॉक्टरांना घेवून बीबीदारफळ, मोहोळ, पंढरपूर, टेंभूर्णी, इंदापूर, बारामती, जेजूरी, सासवड मार्गे वारजे- माळवाडी ब्रिज पुणे येथे नेवुन सोडल्याचे सांगुन त्यासाठी मामाच्या मुलाने व त्याचे मित्राने मदत केल्याचे सांगुन चोरलेले पैसे आपसात वाटुन घेतल्याचे सांगीतले.
 मे. न्यायालयाने अटक आरोपीताची गुन्हयाचे तपास कामी ०४ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि.बंडगर, सोलापुर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.
 अटक आरोपी पैकी मुख्य आरोपीता विरूध्द हवेली पोलीस ठाणे, पुणे  गु.र.नं. 248/10 भा.द.वि. कलम 439,392 व गु.र.नं. 526/2010 भा.द.वि. कलम 439,395 प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल असुन इतर दोन आरोपीता विरूध्द हवेली पोलीस ठाणे गु.र.न. 366/2012 भा.द.वि. कलम 302,109,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. 

सदर गुन्हयातील आरोपीतांकडुन चोरलेले रोख रक्कमेपैकी २ लाख ५० हजार रोख रक्कम हस्तगत केली असून, गुन्हयात वापरलेले इनोव्हा कार नंबर एम.एच. 42 एन 4554 व हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स मोटार सायकल एम.एच. 13 डीजे 8587, व आरोपीतांचे एकूण ०७ मोबाईल असा एकूण ८ लाख १३ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली स.पो.नि. रवींद्र मांजरे, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test