या अपघातात महिंद्रा पिकअप वाहनामधील क्लीनर हा जागीच ठार झाला, तर वाहनचालक हा गंभीर जखमी झाला आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली.सतीश आत्माराम शिंगटे (वय 33 रा. गलांडवाडी नं. 1 ता. इंदापूर जि. पुणे ) असे या अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अपघात जखमी झालेल्या वाहन चालकाची अद्याप ओळख पटली नाही. शनिवारी (दि.9) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पाटस टोल नाक्यापासून काही अंतरावर हा अपघात झाला.
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस हद्दीत टोल नाक्यापासून काही अंतरावर टेम्पो वाहन (क्रमांक एम.एच. 11 ए.एल.1952 ) हे टायर गरम झाल्याने महामार्गालगत उभा होता. त्यावेळी सोलापूर बाजूकडून पुणेकडे भरधाव वेगाने आलेल्या तरकारी मालवाहतूक महिंद्रा पिकअप (क्रमांक एम.एच.42 ए.क्यू. 6183 ) या वाहने महामार्गलगत उभा असलेल्या टेम्पोला पाठीमागे जोरदार धडक दिली.या
अपघातात मालवाहतुक पिकअप टेम्पोमधील क्लीनरला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तर या अपघातात वाहनचालक हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांची मोडतोड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत टेम्पो वाहनचालक हनुमंत तानाजी साळुंके (वय 32,रा.मांडवे ता.माळशिरस जि.सोलापूर ) यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने पिकअप टेम्पो वाहनचालकावर अपघतास कारणीभुत झाल्याप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली