Type Here to Get Search Results !

दातेवाडी फाट्याजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार.

दातेवाडी फाट्याजवळील अपघातात  दुचाकीस्वार ठार.
पुरंदर  प्रतिनिधी : पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर  महामार्गावर वाल्हे नजिक दातेवाडी फाट्याजवळ  टँकरला पाठीमागून  दुचाकीची जोरदार धडक बसल्याने झालेल्या  अपघातात वाल्हे येथील दुचाकीस्वाराचा  मृत्यु झाला आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की काल दिनांक १६ ऑक्टोबर रोजी रात्री  सात वाजलेच्या सुमारास दातेवाडी फाट्याजवळ हा अपघात घडला आहे.वाल्हे येथील दशरथ सुभाष भुजबळ व त्यांचे पाहुणे  नागेश बबन बारवकर दोघे  त्यांच्या मोटर सायकलवरून जेजुरीकडे जात होते.दातेवाडी फाट्या जवळ आले असता, ते रस्त्यात उभ्या असलेल्या टँकरला पाठीमागून ड्रायव्हरच्या बाजुला धडकले. यामध्ये नागेश बारवकर यांच्या छातीला जोरदार मार बसला .या मध्ये ते गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी जेजुरी येथे रुग्णालयात हलविण्यात आले असता उपचार पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. टँकर चालकाने टँकरच्या पाठीमागच्या बाजूला कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर न लावल्याने तो टँकर मोटारसायकल चालकास दिसून आला नाही. आणि यातूनच ही धडक झाली. या कारणाने फिर्यादी दशरथ भुजबळ यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.  त्यानुसार पोलिसांनी टँकर क्रमांक (एम. एच. ४६ बी. एफ. ३९४६) च्या अज्ञात चालक विरोधात भारतीय दंड विधान कलम  २७८अ, ३३७,३३८,मोटर वाहन कायदा कलम १८४,१३४  नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या बाबतचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष मदने करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test