Type Here to Get Search Results !

निंदनीय; यवत येथील खाजगी डॉक्टर कडून गरोदर महिलेला मारहाण.

निंदनीय; यवत येथील खाजगी डॉक्टर कडून गरोदर महिलेला मारहाण.
दौंड प्रतिनिधी - प्रसूती कळा येत असल्याने रुग्णालयात भरती झालेल्या एका महिलेला डॉक्टरकडूनच अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील यवत येथे घडली आहे. याबाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा गोरख दळवी असे मारहाण झालेल्या गरोदर महिलेचे नाव असून त्यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.मारहाणप्रसूती कळा येत असल्याने ही महिला यवत येथील जयवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी या महिलेला तोंडावर, डोक्यावर, हातावर, अमानुष मारहाण केल्याचे तीने तक्रारीत म्हटले आहे. ही मारहाण इतकी अमानुष होती की या मारहाणीमुळे पूजा दळवी यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.
[10/17, 6:29 PM] दौंड पत्रकार: यवत येथील खाजगी डॉकटर कडून गरोदर महिलेला मारहाण करण्यात आली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test