जेजुरी पोलिसांनी दोन वर्षापासून फरार वाळू माफियाला घेतले ताब्यात
जेजुरी प्रतिनिधी - दोन वर्षापासून फरार असलेल्या वाळू माफियाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहिती नुसार जेजूरी पोलीस स्टेशन, गु. रजि. नं. ४०३ / २०१९ भादवि कलम ३५३ , ३७९ हा गुन्हा जेजूरी पोलीस स्टेशनला दिनांक १७/१२/२०१९ रोजी दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाची फिर्याद बाबासाहेब दिनकर मोकाशी, गावकामगार तलाठी पिसर्वे यांनी दिली आहे . गुन्हयातील आरोपींनी पिसर्वे गावचे हद्दीत वाळूची चोरी करून चोरून घेवून जात असताना फिर्यादी व पुरवठा अधिकारी बडदे हे सरकारी अधिकारी असल्याचे असून सुध्दा त्यांना धक्का मारून ट्रक रोडवर मुद्दाम थांबवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
सदर गुन्हयातील आरोपी शिरीष प्रताप पाटील, (वय ३५ वर्ष) , रा . सासवड , ता . पुरदंर जि पुणे हा गुन्हा केलेपासून दोन वर्ष फरार होता. पोलीस त्याचा वेळोवेळी शोध घेत होते . परंतु तो पोलीसांना गुंगारा देत होता . सुनिल महाडीक, पोलीस निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोहवा संदीप कारंडे , पोहवा बनसोडे व पोका प्रविण शेंडे व पोलीस मित्र नाना घोगरे यांना दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार त्याचा शोध घेतला असता सदरचा आरोपी दिनांक ८ रोजी सासवड येथे मिळून आला. त्यास पोलीस हवालदार संदीप कारंडे यांनी अटक केली आहे.