बंडातात्या कराडकर यांचे 'मानवी मूल्य' या विषयावर व्याख्यान संपन्न.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामतीतील सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर च्या एन.एस.एस.विभागा अंतर्गत 'मानवी मूल्य' या विषयावर ह.भ.प.बंडा तात्या कराडकर यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी त्यांनी आपल्या व्यसनमुक्ती चळवळीची पार्श्वभूमी सांगून तरुण पिढी ही निरोगी व निकोप निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करतो आहे असे मत व्यक्त केले. तसेच एक चारित्र्यसंपन्न व्यसनमुक्त पिढी घडवण्याचे माझे ध्येय आहे ही अपेक्षा व्यक्त केली. तसेच मुलांमध्ये परिवर्तन झाले तर त्याचे घर बदलेल पुढची येणारी पिढी बदलेल आणि एकंदर समाजामध्ये परिवर्तन होईल असे त्यांनी मत व्यक्त केले. लहानपणी मुलांवरती चांगले संस्कार करण्याची जबाबदारी हे आई वडिलांचे आहे. कारण पुढच्या पिढीवर चांगले संस्कार घडवायचे असेल तर आई-वडिलांनी प्रयत्न केले पाहिजेत. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे सचिव प्रा.जयवंतराव घोरपडे हे होते.अध्यक्षीय मनोगतामध्ये घोरपडे सरांनी आजच्या धावपळीच्या युगामध्ये तरुण पिढी मध्ये मानवी मूल्य खऱ्या अर्थाने रुजवले पाहिजेत असे मत व्यक्त केले आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये जीवनात मानवी मूल्य अतिशय महत्त्वाचे आहेत त्याचा स्वीकार प्रत्येकाने केला पाहिजे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सहसचिव सतीश लकडे, सर्व विभागाचे उपप्राचार्य. डॉ.देविदास वायदंडे, डॉ. संजू जाधव, सुजाता भोईटे,पत्रकार विनोद गोलांडे, प्रणाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे,सदस्य स्वप्नील काकडे प्रताप गायकवाड व सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी , एन.एस.एस मधील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.एस.शिंदे यांनी केले तर आभार डॉ.दत्तात्रय डुबल यांनी मानले.