...आणि शाळेची घंटा पुन्हा वाजली
कोरोणाच्या महामारी च्या संकटातून थोडासा सर्वानाच दिलासा मिळाल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्वत्रच सोमवार दि 4 नोव्हेंबर रोजी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे शाळा महाविद्यालय सुरू करण्यात आली त्यानुषंगाने बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल वाळवाडी-सोमेश्वरनगर येथील शाळा कोरोणाचे सर्व नियम पालन करून विद्यार्थ्यांसाठी शिक्षक
शिक्षकेतर कर्मचारी स्टाप सुसज्ज करण्यात आला , सकाळीच विद्यार्थ्यांना ऑक्सिजण, स्यानिटाइज ,टेंपरेचर माशीनने तपासनी केल्या नंतरच शाळेत प्रवेश देण्यात आला.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुले शाळेत पुन्हा आल्याने मुलांचे शाळा व शिक्षण विषयी प्रेम आपुलकी व प्रोत्साहन मिळावे म्हणून विद्यार्थी विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देत शाळेचे प्राचार्य सचिन पाठक यांनी मुलांचे स्वागत केले.



