भवानी माता देवीच्या दर्शनाची डोंगर परंपरा कायम
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील चौधरवाडी या गावांच्या डोंगराच्या माथ्यावर भवानी माता ( घटशीळा आई) देवस्थान आहे पूर्वीच्या माहितीनुसार ती देवी तीन मोठ्या शीळांच्यामध्ये वसलेली होती तर कालांतराने तिचे लोक वर्गणीतून मंदिर उभारण्यात आले, व आ
कर्षक भवानी प्रतिकृती देवी बसवण्यात आली या ठिकाणी सालाबादप्रमाणे नवरात्रीमधील दुर्गाष्टमीच्या दिवशी या परिसरातील दहा ते बारा गावचे लोक
एकत्र येऊन देवीची पूजा, आरती आणि डोंगर प्रदक्षि
णा घालून देवीचे दर्शन घेतात तर काही पुणे,मुंबई येथून सुद्धा नागरिक दर्शनासाठी दर वर्षी येत असतात तर देऊवाडी,माळवाडी, करंजे, करंजेपुल, सोरटेवाडी, वाघळवाडी-सोमेश्वरनगर,मुरूम, वाणे-
वाडी,वडगांव निंबाळकर,वाकी, चोपडज ,मुटीँ, या गावांचा समावेश आहे.
नवरात्र विजया दशमी निमित्त शुक्रवारी (दि. १५) रोजी देवीच्या दर्शनासाठी या गावातील भाविकांनी गर्दी केली होती . देवीच्या डोंगरावर शेकडो लोक
एकत्र येऊन तेथील मैदानावर जमतात व दरवर्षी प्रमाणे शिलगण गावकरी व भक्त यांच्या उपस्थितीत पार पडते .नऊ दिवस विधीवत सकाळ - संध्याकाळ ची पुज्या होते तर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा डोंगर रात्रीचा उजळून आला होता.



