वाल्हेतील “ त्या ” भयभीत कुटुंबाला टेकवडे यांचा आधार
पुरंदर प्रतिनिधी : सिकंदर नदाफ-वाल्हे ( ता.पुरंदर ) येथे अज्ञात चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून दिवंगत स्वातंत्र्य सैनिक जी.डी.गायकवाड व राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे माजी तालुका सरचिटणीस नवनाथ चव्हाण यांच्या घरात रात्रीच्या वेळी प्रवेश करून चोरी केल्याची घटना नुकतीच घडली .मात्र या घटनेमुळे दोन कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रसचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांनी त्यांच्या निवासस्थानाला भेट देऊन दोन्ही कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी अजिंक्य टेकवडे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेचे अध्यक्ष सागर भुजबळ राष्ट्रवादी मुंबईचे हनुमंतराव पवार तसेच भाजपचे कार्यकर्ते विकास पवार वाल्हे ग्रामपंचायतीचे सदस्य हनुमंत पवार कॉंग्रेसचे विकासजी पवार आर.पी.आयचे शाखाध्यक्ष शैलेंद्र भोसले पत्रकार गोरखभाऊ मेमाणे आदी मान्यवरांनी व असंख्य युवा कार्यकर्त्यांनी राजेंद्र गायकवाड तसेच नवनाथ चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची देखील विचारपूस केली.दरम्यान अजिंक्य टेकवडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पोलीस प्रशासनाशी थेट संपर्क साधला व या प्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा अशी विनवणी देखील केली.
मात्र या घटनेत लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला असतानाही स्थानिक पुढाऱ्यांनी या प्रकरणाकडे चक्क कानाडोळा करून या कुटुंबातील भयभीत व्यक्तींची साधी विचारपूसही केली नसल्याचे वास्तव समोर आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.



