Type Here to Get Search Results !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती नगरपरिषदेत कायदेविषयक जनजागृती अभियान संपन्न

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  बारामती नगरपरिषदेत कायदेविषयक जनजागृती अभियान संपन्न
बारामती प्रतिनिधी - बारामती नगरपरिषदेमार्फत “आझादी का अमृत महोत्सव”या उपक्रमाचा प्रारंभ मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते करण्यात आला. 
स्वातंत्र्यास  75 वर्ष पुर्ण होत असल्याने 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करुन हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. नगरपरिषदेमार्फत स्वच्छता, वृक्षलागवड व संवर्धन आणि ओला सुका कचरा विलगीकरण आदी विषयांबाबतही जनजागृती मोहिम यानिमित्ताने सुरू करण्यात आली आहे. 
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व बारामती  नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 14 ऑक्टोबर 2021  दरम्यान  सर्वसामान्य नागरिक, महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, तरुणवर्ग व कर्मचारी अशा समाजातील विविध घटकांना  कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 4 ऑक्टोबर 2021 रोजी नगरपरिषदेत घेण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन  शिबिरात ॲड. अजित बनसोडे, सचिव ॲड. धीरज लालबिगे, ॲड. प्रणिता जावळे उपस्थित होते. 
यावेळी ॲड. धीरज लालबिगे यांनी आर्थिक आणि सामाजिकदृष्टया मागास नागरिकांना विधी सेवा समिती मार्फत पुरविल्या जाणाऱ्या मोफत सहाय्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्यांनी विधी सेवा समितीकडून दुर्बल घटकांसाठी मोफत वकील मिळवणे, नैसर्गिक आपत्तीवेळी कायदेशीर मदत मिळवणे, लोकअदालतीचे कामकाज आणि त्याअंतर्गत येणारी प्रकरणे, फिरते न्यायालय व त्याची कार्यपद्धती विषयी माहिती दिली. 
ॲड. प्रणिता जावळे यांनी मनरेगा योजनेबद्दलची विस्तृत माहिती आणि त्यासंदर्भातील विधी सेवा समितीची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.  
या कार्यक्रमास नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test