Type Here to Get Search Results !

मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्षपदी राजू घाटोळे

मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्षपदी राजू घाटोळे
बारामती प्रतिनिधी : मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्षपदी राजू घाटोळे यांची बिनविरोध निवड दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य राज्य पदाधिकारी व निमंत्रितांच्या उपस्थितांच्या बैठकीत सर्वानुमते राजू घाटोळे यांची मोटार ड्रायव्हिंग  स्कूल ओनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली
रस्ता सुरक्षा संदर्भात सी आय आर टी पुणे या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थेमध्ये सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक यांचे करिता भारतातील पहिला सर्टिफिकेट कोर्स सुरू केला या कोर्सच्या अंतर्गत राज्यातील 310 महिला व पुरुष संचालकांनी हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला आहे तसेच राज्याबाहेरील तामिळनाडू राज्यातील 40 मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी सुद्धा हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला आहे आत्तापर्यंत 350 संचालकांनी हा कोर्स यशस्वीपणे पुर्ण केला आहे जागतिक महिला दिनानिमित्त आयडीटीआर पुणे व मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन व प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारमान्य मोटर ड्रायविंग स्कूल महिलांसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 110 महिला सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालकांचे ट्रेनिंग आयडीटीआर पूने येथे यशस्वीपणे पूर्ण केले आहे पी सी आर ए मुंबई व मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य व प्रादेशिक परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर 53 परिवहन कार्यालयात सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक यांचे करिता इंधन बचत परिसंवाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविले आहेत लो नो हॉर्न ओके प्लिज च्या अंतर्गत 12 सप्टेंबर या दिवशी अनावश्यक व विनाकारण हॉर्न वाजू नका यासाठी जन जागृती पर कार्यक्रम आयोजित केले 17 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्यात वाहन चालक दिन म्हणून साजरा करावा हे डॉ अविनाश ढाकणे परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकानुसार 17 सप्टेंबर रोजी वाहन चालक दिन म्हणून साजरा केला या दिवशी ॲम्बुलन्स चालक शिवनेरी चालक टेलर चालक ट्रक चालक रिक्षा चालक या सर्वांना वाहन चालक दिनानिमित्त शुभेच्छा देऊन गुलाब पुष्प देऊन सर्व वाहन चालकांना त्यादिवशी सन्मानित करण्यात आले राजू घाटोळे हे रस्ता सुरक्षा विषयक जागतिक बँकेच्या परिसंवादात" What works and what Does not in Road safety भारताकडू
न प्रतिनिधित्व केले

SKOCH ROUND TABLE MEETING  या सेमिनार मध्ये डॉ अविनाश ढाकणे परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत राजू घाटोळे यांचा सहभाग होता.
राजू घाटोळे यांच्या बिनविरोध निवड झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी निवडीचे स्वागत केले आहे व संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test