मलठणच्या मेंढपाळास शासकीय मदत मिळवून देऊ -डॉ.शितलकुमार मुकणे
गेल्या आठ दिवसात मेंढपाळाच्या 85 मेंढ्यांचा मृत्यू.....
दौंड तालुक्यातील मलठण येथील मेंढपाळ रंगनाथ काशिनाथ देवकाते यांच्या सुमारे 85 मेंढ्या मागील आठ दिवसात अज्ञात कारणाने मयत झाल्या आहेत. यात या मेंढपाळाचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी मलठण येथे भेट देऊन मेंढपाळ देवकाते यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते,तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश जाधव,दौंड पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके,उपसभापती विकास कदम,माजी सभापती ताराबाई देवकाते,सरपंच हनुमंत कोपनर, नवनाथ थोरात यांनी मेंढपाळ रंगनाथ देवकाते उपस्थित होते.
गेल्या आठ दिवसापासून देवकाते यांच्या मेंढ्यांच्या कळपावर तील सुमारे 85 मेंढ्या अज्ञात कारणाने मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे संबंधित मेंढपाळाचे दहा ते पंधरा लाखाचे नुकसान झाले असून या गंभीर घटनेची दखल पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी घेतली.
यावेळी महेश्वर युथ फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्ष संभाजी खडके,उपाध्यक्ष महेश गडदे, उपाध्यक्ष अशोक हंडाळ, संदीपान वाघमोडे,श्रीकांत हंडाळ,सचिन वायसे यांनी मेंढपाळ रंगनाथ देवकते यांना आर्थिक मदत मिळावी असे पत्र पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ.शीतलकुमार मुकणे व गट विकास अधिकारी अजिंक्य येळे यांना दिले.
तसेच आई सेवाभावी संस्थेचे अध्यक्षा शुभांगी धायगुडे यांनी देवकाते यांना आर्थिक मदत म्हणून दहा हजार, माजी चेअरमन नवनाथ वाघमोडे यांनी पाच हजार रुपये दिले.