नवरात्रोत्सवामुळे झेंडूने फुलली 'सोमेश्वर' ची बाजार पेठ.
फोटो ओळ-फुल विक्रेते दादा कामठे व ग्राहक
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :- नवरात्रोत्सवामुळे झेंडूच्या फुलांना मोठी मागणी राहणार आहे. बारामतीतील सोमेश्वरनगर बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी व व्यापारी यांनी झेंडू विक्री साठी दाखल झाली आहे. झेंडूच्या एका किलो साठी शंभर रुपये असा दर आहे या . तुलनेत झेंडूव्यतिरिक्त इतर फुलांना मागणी नव्हती. मात्र, झेंडूच भाव खाऊन गेल्याचे अनेक शेतकरी व विक्रेत्यांनी सांगितले. मागील आठवड्यापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे इतर पिकांबरोबरच नगदी पीक म्हणून गणल्या गेलेल्या फूल शेतीचे मोठे नुकसान झाले. पाऊस व खराब हवामानामुळे फुलांचे मोठे नुकसान झाल्याचे फूल उत्पादक दादा कामठे यांनी सांगितले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्धेच उत्पादन आल्याचे त्यांनी सांगितले. आता उत्पादन घटल्याने बाजारात फुलांना तेजी असलीतरी वाढीव खर्चामुळे अनेक फूल उत्पादक शेतकरी हतबल झाल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो ओळ-फुल विक्रेते दादा कामठे व ग्राहक



