Type Here to Get Search Results !

सोमेश्वर कारखाना पंचवार्षिक निवडणूक; दुसऱ्या गटातही राष्ट्रवादीची सरस

सोमेश्वर कारखाना पंचवार्षिक निवडणूक; दुसऱ्या गटातही राष्ट्रवादीची सरस 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत पहिल्या गटात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या मुरुम-वाल्हा या गटातही राष्ट्रवादीच सरस ठरली असून या गटातील तीनही उमेदवार विजयी झाले आहेत
राष्ट्रवादीपुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने मुरुम-वाल्हा गटात विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे आणि तरुण चेहरा म्हणून ऋषिकेश गायकवाड यांना संधी दिली होती. या तिघांचाही जवळपास १५ हजार मतांच्या फरकाने विजय झाला आहे.
पुरुषोत्तम जगताप यांना १७६२३, राजवर्धन शिंदे यांना १७६०९ आणि ऋषिकेश गायकवाड यांना १७२१५ मते मिळाली आहेत. एकूणच आतापर्यंत जाहीर झालेल्या दोनही गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले असून विरोधकांना अत्यल्प मतांवर समाधान मानावे लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test