मोरगाव -हडपसर पीएमपीएमएल बस सेवेचा शुभारंभ संपन्न.
सोमेश्वरनगर प्रतिनीधी
मोरगाव ते हडपसर पीएमपीची बस सेवा सुरु झाली असल्याने पुणे ,सासवड, जेजुरी येथून मयुरेश्वर दर्शनासाठी भक्तांना होईल असे प्रतीपादन बारामती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी मोरगांव ता बारामती येथे केले त्या बस सेवेचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या .
गुरुवार दि ७ पासून मोरगाव-हडपसर पीएमपीएमएल बस सेवेचा शुभारंभ बारामती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला . यावेळी बारामती पंचायत समीती सदस्य राहुल भापकर ,सरपंच निलेश केदारी , जिल्हा परीषद सदस्य भरत खैरे ,दत्तात्रय झेंडे चिफ ट्रान्सपोर्ट , गुलाबराव गायकवाड आगार व्यवस्थापक हडपसर , माजी सरपंच पोपट तावरे , तरडोली सरपंच नवनाथ जगदाळे , प्रवीण शिर्के , व परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते .
बारामतीतील मोरगाव येथे राज्यासह परराज्यातुन गणेश भक्त मयुरेश्वर दर्शनासाठी येत असल्याने पीएमपीएमएल बस सेवा सुरु करण्याची मागणी मोरगांवचे सरपंच निलेश केदारी व चिंचवड देवस्थान ट्रस्टने पुणे महानगर परीवहन मंडळाकडे पत्रव्यवहाराद्वारे केली होती . केदारी यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांकडे केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे आज नवरात्री उत्सव व घटस्थापनेच्या मुहर्तावर बस सेवा सुरु केली . या बससेवेचा लाभ गणेश भक्त , व्यवसाईक , नोकरदार , विद्यार्थी , शेतकरी , कामगार यांना होणार असल्याने मोरगावसह परीसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.