Type Here to Get Search Results !

..त्या गावात भरदिवसा अंधाधुंद गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना

...त्या गावात भरदिवसा अंधाधुंद गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना 
पुण्यात दोन टोळ्यात ( Gangwar in Pune ) भरदिवसा अंधाधुंद गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली असून, या गोळीबारात एका गुंडासह दोघांचा मृत्यू झाला. तर , एक बॉडीगार्ड जखमी झाला. हा गोळीबार ऊरुळी कांचन येथील हॉटेलसमोर भरदिवसा झाला असून, यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

   गोळीबाराने पुन्हा शहरात टोळीयुद्ध भडकल्याचे पाहिला मिळत आहे. कुविख्यात गुंडाच्या नंबरकारी गुन्हेगारावर हा गोळीबार वाळू व्यवसाय आणि पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोणी काळभोर पोलीसांनी धाव घेतली आहे. संतोष संपतराव जगताप यांच्यासह विरुद्ध पार्टीतील एकाचा या गोळीबारात मृत्यू झाला आहे. तर , संतोष जगताप याचा बॉडीगार्ड जखमी झाला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे . मिळालेल्या माहितीनुसार , उरुळी कांचन ( ता. हवेली ) येथील हॉटेल सोनईसमोर संतोष जगताप हा बसलेला असतो. तो नेहमी या हॉटेलसमोर बसतो. दरम्यान, तो सराईत गुन्हेगार असून, कुविख्यात गँगचा सदस्य आहे. दरम्यान, तो राहू येथील असून, त्याचा परिसरात वाळू व्यावसाय देखील आहे. शुक्रवारी (ता. २२) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वाहनांवर आलेल्या चार ते पाच जणांनी त्याच्यावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. यात संतोष जगतापला दोन गोळ्या लागल्या. त्यावेळी त्याने जखमी अवस्थेत देखील गोळीबार केला. तर, त्याच्या बॉडीगार्डने देखील गोळीबार केला. यात विरुद्ध टोळीतील एकाला गोळी लागली. भरदिवसा रस्त्यावरच गोळीबाराच थरार घडल्याने मोठी खळबळ उडाली. गोंधळ उडाल्यानंतर वाहनांवर आलेल्यांपैकी तीन ते चार जण पळून गेले. त्यानंतर तात्काळ संतोष जगताप व बॉडीगार्डसह तिघांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु , तेथून या तिघांनाही ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test