सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त टेकवडे यांच्या हस्ते दुर्गामातेची महाआरती.
पुरंदर प्रतिनिधी सिकंदर नदाफ :देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी भेकराईनगर येथे बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य भैय्या टेकवडे यांच्या हस्ते दुर्गामातेची महाआरती करण्यात आली. या दरम्यान पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक गणेश आबा ढोरे, हवेली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भरतभाऊ झांबरे, राष्ट्रवादी चे पुणे शहर उपाध्यक्ष राजाभाऊ सुर्यवंशी, तसेच राहुल चोरघडे शौकतभाई शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाशनाना हरपळे ,यांसह बापूसाहेब पवार, शिवसेना नेते सतिशभाऊ जगताप राष्ट्रवादी चे युवा नेते सुहास आबा खुटवड ,रमेश आप्पा निवंगुणे प्रकाश काका शेवाळे , संतोषभाऊ सरोदे , अॅड. सतिश रणनवरे, अनिल दाते, मा. संजयबापु गरूड, रमाकांत आण्णा कोलते, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब होरे, नंदकुमार शिंदे, सूर्यकांतभाऊ गिरीगोसावी , गणेश भाऊ हरपळे संजय थोरात, हनुमंत यादव शिरीष जाधव, संतोषभाऊ पवार, अशोक खोपडे सुनिलभाऊ पवार, गिरीश पवार, मनोज शिंदे , राजेश भोसले, प्रमोद कदम, भाऊसाहेब कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पवार साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी येथील दुर्गामाता मंदिरात अभिषेक देखील घालण्यात आला...याप्रसंगी भेकराईनगर-फुरसुंगी मधील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती..



