Type Here to Get Search Results !

सोमेश्वर कारखाना गाळप हंगाम सुरु करण्यास सज्ज - राजेंद्र यादव

सोमेश्वर कारखाना गाळप हंगाम सुरु करण्यास सज्ज - राजेंद्र यादव
सोमेश्वरनगर  प्रतिनिधी
बारामती  तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु करण्यासाठी कारखान्यातील सर्व अंतर्गत कामे पुर्ण झाली असुन सोबतच आपल्या कारखान्याचे सुरु असणारे विस्तारीकरणाचे कामही प्रगतीपथावर असुन आपण आपला कारखाना सुरु करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक.राजेंद्र यादव यांनी दिली. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या साठाव्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभावेळी श्री यादव बोलत होते. राजेंद्र यादव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मनिषा यादव व चिफ अकौंटट .योगीराज नांदखिले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुचिता नांदखिले या उभयतांच्या हस्ते व कारखान्याचे अधिकारी व कामगार यांच्या उपस्थितीत बॉयलर पुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.यादव पुढे म्हणाले की, कारखान्याने गत हंगामाची संपुर्ण एफ.आर.पी. सभासदांना अदा केली असुन येणा-या हंगामात सभासदांच्या नोंदलेल्या संपुर्ण उसाचे वेळेत गाळप व्हावे यासाठी आतील संपुर्ण कामे पुर्ण करीत आपले सुरु असलेले विस्तारवाढीचे काम माहे जानेवारीअखेर पुर्ण करायचा मानस असुन जानेवारीपासुन प्रतिदीन ७५०० मे.टनाने गाळप कारखाना करेल असा विश्वास आहे.श्री सोमेश्वर कारखान्याकडे येत्या हंगामात ३७ हजार एकर ऊसक्षेत्राची नोंद झाली असुन यातुन जवळपास १४ ते १५ लाख मे.टन ऊस गाळपास ऊपलब्ध होण्याचा अंदाज आहे. यापैकी काही प्रमाणात शेजारील कारखान्यांना ऊस गाळपास देण्यासाठी आम्ही चार ते पाच कारखान्यांसोबत पत्रव्यवहार केला असुन सभासदांचा संपुर्ण ऊस गाळण्याचा आमचा प्रयत्न राहिल. यावेळी कारखान्याचे संचालक किशोर भोसले, लालाभाऊ नलवडे सभासद राहुल वायाळ, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक निंबाळकर यांनी केले तर आभार संचालक विशाल
गायकवाड यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test