१९ वर्षीय अंशूने आक्रमक सुरुवात करताना १-० अशी आघाडी घेतली. ती जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली महिला कुस्तीपटू म्हणून ठरली सामन्याने नाट्यमय कलाटणी प्राप्त केली आणि मॅरोलिसने अंशूच्या खांद्याची पकड घेत तिला जमिनीवर आदळत २-१ अशी आघाडी घेतली.
मग मॅरोलिसने अंशूची पाठ टेकवत चीतपट केले आणि ४-१ अशा फरकाने तिने विजय मिळवला आहे.
तर युवा कुस्तीपटू १९ वर्षीय अंशू मलिकने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमधील ५७ किलो वजनी गटाचे रौप्यपदक जिंकताना इतिहास घडवला. २०१६च्या ऑलिम्पिक विजेत्या हेलेन लॉसी मॅरोलिसने गुरुवारी अंतिम सामन्यात तिला चीतपट केले.भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असले तरी ही ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.
जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरलेल्या १९ वर्षीय अंशूने आक्रमक सुरुवात करताना १-० अशी आघाडी घेतली. परंतु त्यानंतर सामन्याने नाट्यमय कलाटणी प्राप्त केली आणि मॅरोलिसने अंशूच्या खांद्याची पकड घेत तिला जमिनीवर आदळत २-१ अशी आघाडी घेतली. मग मॅरोलिसने अंशूची पाठ टेकवत चीतपट केले आणि ४-१ अशा फरकाने विजय मिळवला. मॅरोलिसची पकड इतकी घट्टी होती की, सामना संपल्यानंतर अंशूसाठी त्वरित वैद्यकीय साहाय्य घ्यावे लागले. सुवर्णपदक हुकल्यामुळे तिला अश्रू आवरणे कठीण गेले.
गीता फोगट (२०१२), बबिता फोगट (२०१२), पूजा धानडा (२०१८) आणि विनेश फोगट यांनी जागतिक स्पर्धेत कांस्यपदके पटकावली. जागतिक पदक पटकावणारी अंशू पाचवी आणि रौप्यपदक मिळवणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली.