Type Here to Get Search Results !

श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान-करंजे यांच्या मार्फत सोमेश्वर कारखान्याचे नावनिर्वाचीत संचालकांचा सत्कार.


श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान-करंजे यांच्या मार्फत  सोमेश्वर कारखान्याचे नावनिर्वाचीत संचालकांचा सत्कार.
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर करंजे येथे मंगळवार दि.१९ रोजी कोजागिरी/शरद पौर्णिमा आहे. देशाचे नेते,माजी केंद्रीय मंत्री व  पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांचे जीवनातील येणाऱ्या एकूण पौर्णिमा पैकी ८१ व्या वर्षांतील १००० वी "कोजागिरी/शरद पौर्णिमा" आहे. यानिमित्ताने  साहेबांचे अभिष्टचिंतन करून त्यांना  दीर्घायुष्य होवोत व त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्री क्षेत्र  सोमेश्वर शिवलिंग महारुद्र  अभिषेक श्री सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप नवनिर्वाचित संचालक किसनराव तांबे व संग्राम सोरटे यांच्या हस्ते करण्यात आला.
  श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची नुकतीच  पंचवार्षिक निवडणूक झाली असून या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्‍वर विकास पॅनलचे सर्वच उमेदवार भरगोस मतांनी निवडून आलेल्या 21 संचालकांचे अभिनंदन व सत्कार समारंभ  श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट-करंजे यांनी दि १९ मंगळवार रोजी संध्याकाळी सोमेश्वर मंदिर परिसरात ठेवण्यात आला होता.
   या वेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे ,श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना नवनिर्वाचित संचालक मंडळ पुरुषोत्तम जगताप, राजवर्धन शिंदे, शैलेश रासकर शिवाजीराव राजेनिंबाळकर ,लक्ष्मण गोफणे ,संग्राम सोरटे ,किसन तांबे, अभिजित काकडे , ऋषिकेश गायकवाड, जितेंद्र निगडे, प्रविण कांबळे, रणजित मोरे, कमल पवार यांचा सत्कार समारंभ श्री सोमेश्वर देव ट्रस्ट करंजे (ता बारामती) यांनी आयोजित केला होता. देवस्थान ट्रस्ट प्रताप भांडवलकर, सचिव राहुल भांडवलकर  खजिनदार  सोमनाथ भांडवलकर विश्वस्त संतोष भांडवलकर , राजेंद्र भांडवलकर ,योगेश भांडवलकर ,सागर भांडवलकर ,सचिन मोकाशी, प्रकाश मोकाशी,मोहन भांडवलकर
,भाऊसाहेब भांडवलकर ,बाळासाहेब भांडवलकर ,प्रविण भांडवलकर,तात्यासाहेब मोकाशी, याच्या हस्ते संपन्न झाला. 
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, मेनका मगर ,बारामती दक्षता कमिटी सदस्य सुचित्रा साळवे, रुपचंद शेंडकर, वाकी सरपंच किसन बोडरे, सदस्य इंद्रजित जगताप, पळशी सरपंच भाऊसाहेब चोरामले, धनंजय गडदरे,युवा कार्यकर्ते निखिल शेंडकर,बाळासाहेब शिंदे , यादवराव शिंदे,देशमुख साहेब,तात्यासाहेब शिंदे ,तात्यासाहेब मोकाशी ,दादा कामठे, संतोष शेंडकर,पत्रकार विनोद गोलांडे व पंचक्रोशीतील  सन्मानीय मान्यवर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला तर कोजागिरी पौर्णिमा निमित्त श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने मसाले दूध वाटप उपस्थित मान्यवरांना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test