Type Here to Get Search Results !

जेजुरीचा मर्दानी दसरा उत्सव रद्द...

जेजुरीचा मर्दानी दसरा उत्सव  रद्द...
जेजुरी प्रतिनिधी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन बांधवांचा लोक देव असणाऱ्या श्री खंडेरायाचे मंदिर सर्व मल्हार भक्तांना मुख दर्शनासाठी दिनांक 7 ऑक्टोंबर 2021 रोजी शासनाने दिलेल्या अटी व नियमांच्या अधीन राहून उघडण्यात आलेले आहे. 
सालाबाद प्रमाणे यंदा देखील जेजुरीचा मर्दानी दसरा उत्सव हा शासनाचे उत्सव साजरे करण्यासंदर्भात कोणतेही आदेश पारित न झाल्यामुळे रद्द करण्यात आलेला आहे. 

     श्री खंडेरायाचे दसरा उत्सव वेळीचे रुढी -परंपरेने चालत आलेले धार्मिक विधी म्हणजेच ध्वज पूजन, खंडा पूजन, घट उठविणे, श्रींच्या मूर्तीची भेटाभेट, आपटा पुजन, ग्राम प्रदक्षिणा सीमोल्लंघन व रोजमारा वाटप हे मोजक्याच पुजारी सेवेकरी, नित्य वारकरी, मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये शासनाने कोरोना संदर्भात दिलेले सर्व नियम पाळून करण्यात येणार आहेत, तरी सर्वधर्मीय भाविक भक्तांना या निवेदनाद्वारे श्री मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे यांनी आवाहन केले की यंदाचा दसरा उत्सव रद्द करण्यात आलेला आहे व शासनाने दिलेल्या अटी व नियमानुसार फक्त मुक्त दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test