Type Here to Get Search Results !

मसनेर देवाच्या चरणी अजिंक्य टेकवडे नतमस्तक.

मसनेर देवाच्या चरणी अजिंक्य टेकवडे नतमस्तक.

पुरंदर प्रतिनिधी : पुरंदर तालुक्यातील वाल्हे सह कामठवाडी येथील धनगर  समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या मसनेर महाराज   देवाच्या एकदिवशीय यात्रेला राष्ट्रवादी चे कृतीशील नेते अजिंक्य भैय्या टेकवडे यांनी सदिच्छा भेट देत उत्सवमूर्तींचे दर्शन घेतले. यावेळी ढोल ताशांचा गजर त्यातच गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण    करून  मसनेर  महाराजांचं  चांगभल या जयघोषात  श्री  क्षेत्र  वाल्हे सह कामठवाडी येथील मसनेर महाराज देवाच्या एकदिवशीय यात्रेला उत्साहात सुरवात  करण्यात आली .दरम्यान मदने परिवारातील मानकऱ्यांच्या हस्ते या देवतेची विधिवतपूजा अर्चा करत देवाला अभिषेक घालण्यात आला .  तर येथील भाविकांनी  यात्रेनिमित्त पारंपारिक  वाद्याच्या गजरात   गजीनृत्य  सादर  करून  उपस्थितांची मने देखील जिंकली.

अशातच बारामती लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे  अध्यक्ष अजिंक्यभैय्या  टेकवडे यांनी या यात्रेस  सदिच्छा  भेट देऊन  मसनेर महाराजांचे दर्शन घेतल्याने  धनगर समाजात आनंदाचे  वातावरण  निर्माण  झाले. 
    यावेळी  अजिंक्यभैय्या टेकवडे यांना फेटा व  घोंगडी  देऊन  त्यांचे   जोरदार स्वागत  करण्यात  आले  असून  आगामी  काळातही मसनेर देवाची कृपा  आपल्या  सदैव पाठीशी  राहिल असा  विश्वास  देखील  येथील  धनगर  समाजाकडून व्यक्त करण्यात  आला.  या  दरम्यान  जिल्हा  बँकेचे  माजी अध्यक्ष प्रा.  दिगंबर  दुर्गाडे यांसह धनगर समा
जाचे नेते भिमराव मदने मांडकी गावचे माजी सरपंच सतीश  जगताप  बाबुराव मदने ,  भाऊसाहेब   मदने  पत्रकार गोरख मेमाणे राष्ट्रवादी चे विद्यार्थी  संघटनेचे तालुकाध्यक्षसंदेश पवार सामाजिक कार्यकर्ते विकास पवार,संतोष गायकवाड,यांसह अमोल कदम, विशाल पवार,मनोज कदम,तसेच पोपट मदने,  सुरेश जगताप आदी मान्यवरांनी  देखील उपस्थिती दर्शवत  उत्सवमू
र्तींच्या  दर्शनाचा  लाभ   घेतला. यावेळी  उपस्थितांचे आभार दादासाहेब मदने यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test