...त्या गावातून जाणारी 'लालपरी' दीड वर्ष्यानी पुन्हा धावली.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
तब्बल १९ महिन्या नंतर संगावी वरून वाकी मार्गे पुण्याला धावणारी लालपरी धावली. कोरोनाच्या काळात सांगवी( वाकी चोपडज मार्गे) पुणे ही एसटी बस प्रवाशांच्या सोयीसाठी बारामतीतील वाकी चोपडज, कानाडवाडी व इतर गावातील प्रवाशी ग्रामस्थांच्या मागणीनुसार एसटी बस पुणे विभागीय महाव्यवस्थापक रमाकांत गायकवाड यांच्या सुचनेनुसार सुरू झाली. ही बस सेवा सुरू झाल्याने अनेक व्यापारी ,विद्यार्थी तसेच इतर प्रवाश्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे,तसेच वाकी ग्रामस्थांनी महामंडळ चे आभार मानले.या एसटी चे चालक व्ही.आर.चांदगुडे.व वाहक एस.एस.भुजबळ, एसटी डेपो बारामती एम आय डीसी . यांचें वाकी नजिक पांढरवस्ती येथे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी वाकी गावचे सरपंच किसन बोडरे , उपसरपंच, ह.मा.जगताप, बबन जाधव.मा.सरपंच हनुमंत गाडेकर, दिलीप गाडे, मधुकर भिसे, उमेश आहेरकर आदी ग्रामस्थं मान्यवर उपस्थित होते,
ST च्या सेवेला लोकांनीं भरभरून प्रतिसाद द्यावा. ST आणि कर्मचारी यांच्या विषयीं आदरभाव जपल्या बद्दल खरोखरच मनापासून धन्यवाद.
ReplyDelete