बी.एम.गायकवाड यांची शिवाजी मराठा हायस्कूल ज्यु काॅलेज स्कूल कमिटीच्या अध्यक्ष पदी निवड
पुणे,पुणे शहर व जिल्ह्यातील 104 वर्षे झालेली ऐतिहासिक शैक्षणिक संस्था 'श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणे ' या संस्थेच्या नवीन पदाधिकारी यांची नुकतीच निवङ झाली.राजर्षि शाहू महाराज--अध्यक्ष .राजेंद्र जगताप--उपाध्यक्ष. अण्णा थोरात मानद सचिव.जगदिश जेधे खजिनदार संचालक म्हणून --बी.एम.गायकवाड कमल व्यवहारे,ङाॅ.सुनील जगताप, ॲङ.एन ङी पाटील, ङाॅ.नितिन पवार ,यांची निवड झाली. नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत बी.एम.गायकवाड यांची शिवाजी मराठा हायस्कूल व ज्यु काॅलेज स्कूल कमिटीच्या अध्यक्ष पदी निवङ करण्यात आली.सोसायटी अंतर्गत हायस्कूल ज्यु,व सिनियर काॅलेज,बी.एङ, एम एङ.लाॅ काॅलेज ऑर्किटेक्ट काॅलेज पुणे शहरात व दौंड तालुक्यात इंग्रजी स्कूल आहे. एकुण 14000मुले मुली शैक्षणिक सुविधेचा लाभ घेत आहेत