जवळार्जुन येथे PMPL चे जंगी स्वागत
पुरंदर प्रतिनिधी सिकंदर नदाफ
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विशेष प्रयत्नातून सुरु करण्यात आलेल्या हडपसर ते मोरगाव PMPL चे जवळार्जुन येथे पुष्पवृष्टीने जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे तसेच बसचे चालक विश्वनाथ गार्डी यांसह वाहक रुपेश भामे यांचा शाल श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला तर बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांनी देखील गुलाब पुष्प देऊन प्रवाशांचे स्वागत केले.
दरम्यान मोरगाव हे अष्टविनायकापैकी प्रथम व महत्वाचे स्थान असल्याने भाविकांसह प्रवाशी ,शेतकरी ,व्यापारी व विद्यार्थी वर्गासाठी या PMPL बस सेवेचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनीही PMPL वर अक्षरशः पुष्पवृष्टी करून आनंदोत्सव देखील साजरा केला.
याप्रसंगी जवळार्जुन गावचे सरपंच सोमनाथ कणसे यांसह पोपट गुळूंबकर, सौरभ टेकवडे, दत्तात्रेय भामे ,किसन जाधव, सुजित राणे ,आकाश चाचर ,संतोष भामे नारायण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.