Type Here to Get Search Results !

गुणपडताळणीसाठी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये ५ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध

गुणपडताळणीसाठी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये ५ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध

पुणे दि.२४: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती, भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम (तात्पुरता) निकालाबाबत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये ५ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल २४ नोव्हेंबर २०२१ रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये २४ नोव्हेंबर  ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता ५० रूपये याप्रमाणे शुल्क रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी तसेच ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी ५ डिसेंबर २०२१ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित  शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test