मनाई आदेश पोलिसांच्या पूर्व परवानगीने घेतलेल्या कार्यक्रमांना लागू नाही
पुणे दि.15-अमरावती, मालेगाव, नांदेड, पुसद व कारंजा येथे झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फौजदारी प्रक्रिया संहिता 1974 च्या कलाम 144 अन्वये पारित केलेले मनाई आदेश ग्रामसभा, शासकीय बैठका, शासकीय कार्यक्रम, पोलिसांच्या पूर्व परवानगीने घेण्यात येणाऱ्या सभा, कार्यक्रम यांना लागू राहणार नाहीत असे जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आदेशीत केले आहे. यासंबंधीचा सुधारित आदेश आज निर्गमित करण्यात आला.



