पुणे: आज पासून दोन वर्षांपूर्वी सकाळी सकाळी लोकांना धक्का बसला होता.भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे शपथ घेऊन अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. घटनेला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत.
२३ नोव्हेंबर २०१९ साली देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाला त्यामुळे एक वेगळे वळण लागले होते.
कोणालाही न कळत पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दोन परस्परविरोधी विचारधारांचे प्रतिनिधीत्व करणारे हे दोन नेते सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्याने महाराष्ट्रातील जनतेला आश्चर्याचा धक्का बसला होता. सकाळी सकाळी चाय पे चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.हे कसे घडू शकते?, हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता.
मात्र काही राजकीय घडामोडींमुळे भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आधीच अल्पमतात आलेलं फडणवीस सरकार अवघ्यात साडेतीन दिवसात कोसळलं.अजित पवारांनी आपला पाठिंबा काढून घेतला त्यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
मात्र अजित पवार यांनी काही तासांमध्ये राजीनामा दिल्याने सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता.



