Type Here to Get Search Results !

"साद संवाद स्वच्छता ग्रुप" च्या वतीने किल्ले स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न ;कोव्हिडं योद्धाचा सन्मान

"साद संवाद स्वच्छता ग्रुप" च्या वतीने किल्ले स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न ;कोव्हिडं योद्धाचा सन्मान.
फोटो ओळ -प्रथम बक्षीस स्वीकारताना कलाईट ग्रुप माळशी इंद्रनील जगताप व सहकारी

सोमेश्वरनगर   ...बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे किल्ले बनवा उपक्रम "साद संवाद स्वच्छता ग्रुप"च्या वतीने दिवाळी निमित्त आयोजित केलेला होता, बाल चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
     या सर्व सहभागी लहान गट व मोठ्या गटांतील स्पर्धकांना "साद संवाद स्वच्छता ग्रुप" च्या वतीने विविध स्वरूपाची रोपे, ट्रॉफी स्वरूप पारितोषिक प्रदान करण्यात आली , मुलांना आपल्या इतिहासाची त्याचे साक्षीदार असलेल्या गडकोटांची माहिती व्हावी व ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्यांचे स्वराज्यनिर्मितीसाठी चे असणारे योगदान आणि एकूणच या सर्व काळाचा मुलांकडून अभ्यास व्हावा, तसेच  यादृष्टीने त्यांच्याबद्दलची आवड वृद्धिंगत व्हावी या दृष्टीनेच "साद संवाद स्वछता ग्रुप" गेले पाच वर्ष हा उपक्रम राबवत आहे . सहभागी मुलांना प्रोत्साहन पर बक्षिसे देऊन त्यांच्या बनवलेल्या गडकिल्ले प्रतिकृती  कौतुकही केले ,  आयोजित केलेल्या या उपक्रमात सुमारे 150 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तर मुलांनी वेगवेगळ्या गडकोटांच्या आकर्षक प्रतिकृती उभारल्या होत्या,
    आयोजित किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण प्रसंगी कोविड योध्दा , गुणवंत विद्यार्थी  गुणगौरव असा कार्यक्रम 'रामराजे जगताप स्मृती भवन' येथे उत्साहात पार पडला 
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर  युवराज भोसले यांनी केले उपस्थितांचे स्वागत रोहित बोत्रे यांनी केले , प्रास्ताविक ज्ञानेश्वर जगता , मनोगत सुनील भोसले , राजेंद्रबापू जगताप व संदीप जगताप  तर आभार मनोज दिक्षित गुरुजी यांनी मानले
   या कार्यक्रमासाठी जयवंत भोसले , बाळासाहेब जगताप , दिग्विजय जगताप ,राजेंद्रबापू जगताप, सुनील आबा भोसले ,चंद्रशेखर जगताप , संजय जगताप, दीपक साखरे, रोहितभ जगताप , नानासो जगताप , संदीप जगताप  , गोपाळ चव्हाण , दुष्यंत चव्हाण ,अँड.नवनाथ भोसले , पत्रकार युवराज खोमणे, विनोद गोलांडे , नंदकुमार जगताप , धनंजय चौगुले  , डॉ .विलास काटकर , डॉ .गणेश जगताप , डॉ. प्रदीप भोसले , डॉ. अमोल जगताप , सरपंच स्मिता काकडे ,  साद संवाद चे सर्व सदस्य तसेच जेष्ठ नागरिक , ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते .
■■■■■■■■■■■■■■ ■■■■■■■■
मोठा   गट   -   प्रथम  क्रमांक-  स्वराज्य   ग्रुप      वाणेवाडी  ,कलाईट ग्रुप माळशी यांना देण्यात आला तृतीय क्रमांक-शिवेंद्र  विश्वजित भोसले
लहान  गट -  प्रथम   ,   द्वितीय   , तृतीय यांना सन्मानचिन्ह व बक्षीस प्रधान करण्यात आली.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test