संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिकावाचन
पुणे, दि. 26- संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, भाऊसाहेब गलांडे, संजय तेली, महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, नायब तहसीलदार श्रावण ताते यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.