प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा
बारामती, दि. 26:- संविधान दिनानिमित्त आज तहसिल कार्यालयात तहसिलदार विजय पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार महादेव भोसले, तसेच तहसिल कार्यालय व इतर कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.