सोमेश्वरनगर - निरा - बारामती रस्त्यावर निराहून बारामती दिशेला जाताना करंजेपुल(ता बारामती) निरा डावा कालवा चड उतरताना एका झाडाची फांदी तुटून खाली अली आहे. ही तुटलेली फांदी साधारण दोन ते दिवस झाले आहे, व ती फांदी कोत्याही क्षणी रस्त्यावर , दुचाकी किंव्हा येणाऱ्या प्रवाश्यांवर कोसळून अपघात होऊ शकतो तर त्यामुळे वाहतुकीला त्रास होतोय. सोमेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम चालू असून ऊस वाहतूक करणारे या फांदीला बगल देण्याच्या मार्गावर काही वाहने अडथळा निर्माण होऊन ट्रॅफिकही होते ,तरी संबंधित अधिकारी ती फांदी काढून नागरिकांना होणार त्रास दूर करतील काय?असा सवाल निर्माण झाला आहे. संबंधीत अधिकारी यांना कधीच रस्त्यावरील खड्डे, खचलेल्या साईड पट्ट्या तसेच वेडीवाकडी वळणावरील वाढलेली झाडी जोडपी दिसत नाही असे स्पष्ट शब्दात एका सामान्य नागरिकाने बोलताना सांगितले व प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.