Type Here to Get Search Results !

बारामतीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेची १३४ प्रकरणे मंजूर

बारामतीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेची १३४ प्रकरणे मंजूर
बारामती: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या बारामती संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची संजय गांधी योजना,श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी निवड सभा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या अध्यक्षतेखाली आजरोजी संपन्न झाली.
    या सभेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ७५ प्रस्ताव, श्रावणबाळ योजना ५८  प्रस्ताव,इंदिरा गांधी योजना ५ प्रस्ताव, राष्ट्रीय कुटुंब योजना ६ प्रस्ताव असे एकूण १४४ प्रकरणे सादर करण्यात आली होती.
  त्यापैकी १३४ प्रकरणी मंजूर करण्यात आली व १० प्रकरणे नामंजूर करण्यात आली.
यावेळी समितीचे अध्यक्ष धनवान वदक, सदस्य सुनिल बनसोडे,शिवराज माने,शहाजी दळवी लालासो होळकर,अशोकराव इंगवले 
सदस्या नुसरत इनामदार,जीवना मोरे
आदींसह तहसीलदार तथा सचिव विजय पाटील,नायब तहसीलदार महादेव भोसले, अव्वल कारकून सुरेश जराड,लिपिक स्वप्नील जाधव, मदतनीस तृप्ती घोडके आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test