महत्वाची बातमी;मॉडेल कौशल्य विकास केंद्रासाठी मु.सा.काकडे महाविद्यालयाची निवड.
सोमेश्वरनगर - बारामतीतील सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाची मॉडेल कौशल्य विकासासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातून निवड झाली.महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्यामार्फत 'करियर कट्टा ' या उपक्रमाअंतर्गत सुरु होणाऱ्या मॉडेल कौशल्य विकास केंद्रासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 59 महाविद्यालयाची निवड करण्यात आली यामध्ये मु.सा. काकडे महाविद्यालयाची निवड झाली या अंतर्गत विद्यार्त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ,प्रगतीसाठी ,विविध कौशल्य विकाशभिमुख अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत.वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची , तसेच औद्योगिक कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी आणि केंद्र समन्वयक प्रा.डॉ नारायण राजूरवार यांनी दिली.
महाविद्यालयाचे अध्यक्ष .सतीश काकडे देशमुख, सचीव.प्रा जयवंतराव घोरपडे ,सहसचिव सतीश लकडे ,सोमेश्वरचे संचालक आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिजित काकडे देशमुख ,जिल्हा परिषद पुणे येथील आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काकडे देशमुख तसेंच सर्व व्यवस्थापन समिती सदस्य यांनी मॉडेल कौशल्य विकास केंद्रासाठी महाविद्यालयाची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी आणी केंद्र समन्वयक प्रा.डॉ नारायण राजूरवार यांचे अभिनंदन केले आणि मॉडेल कौशल्य विकास केंद्रासाठी शुभेच्छा दिल्या.