भिक्षेकरी पुनर्वसनासंबंधी मंगळवारी कार्यशाळा
पुणे दि.२९: राज्याच्या महिला व बाल विकास आयुक्तालयामार्फत ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता भिक्षेकरी पुनर्वसनासंबंधी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू तसेच महिला व बालविकास आयुक्त राहुल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे.
कार्यशाळेस भिक्षेकरी पुनर्वसनासंबंधी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, भिक्षेकरी गृहाचे अधीक्षक तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी आणि संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सहभागी होणार असल्याचे सहाय्यक आयुक्त ममता शिंदे यांनी कळविले आहे.