Type Here to Get Search Results !

एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली मोठी ऑफर; संप मिटण्याची शक्यता!

एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली मोठी ऑफर; संप मिटण्याची शक्यता!
मुंबई: मिटवण्याच्या दिशेने मोठी पावले टाकण्यात आली आहेत. आज परिवहन मंत्री यांनी याबाबत महत्त्वाची बैठक बोलावत चर्चा केली. बैठकीला आमदार , तसेच एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुमारे दोन तास ही बैठक चालली. त्यानंतर परब यांनी महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली आहे. दरम्यान, एसटी कर्मचारी मात्र अजूनही विलीनकरणावर ठाम आहेत. ( ) वाचा: एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा निर्माण झाली आहे. आज परिवहन मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सरकारच्या वतीने कर्मचाऱ्यांना नवा पर्याय देण्यात आला आहे. एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. याबाबत हायकोर्टाच्या आदेशाने समिती नेमण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढचा निर्णय घेता येणार आहे. ही बाब निदर्शनास आणून देत परब यांनी अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवला. याबाबत नंतर परब यांनी माध्यमांना तपशील दिला. वाचा: ' सुरू आहेत. आज सकारात्मक चर्चा झाली. आम्ही सरकारकडून प्रस्ताव दिला आहे. आता उद्या सकाळी ११ वाजता यासंदर्भात पुन्हा बैठक होणार आहे', असे परब म्हणाले. कर्मचारी संघटनेकडून दोन-तीन पर्याय देण्यात आले आहेत तर आम्ही अंतरिम पगारवाढीची तयारी दर्शविली आहे. हा प्रस्ताव मान्य करावा आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावे, अशी आमची विनंती आहे. सरकार दोन पावले पुढे येत असेल तर कर्मचाऱ्यांनी दोन पावले मागे जायला हरकत नाही. आता अधिक न ताणता आपण चर्चेतून मार्ग काढू, असे आवाहनही परब यांनी केले. संपामुळे एसटी महांडळाला मोठा आर्थिक फटका बसत आहे, शिवाय प्रवाशांचेही प्रचंड हाल होत आहेत. आता शाळा सुरू झाल्याने शाळकरी मुलांचीही बसअभावी मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन परब यांनी केले. विलिनीकरणाबाबत समितीचा जो अहवाल येईल तो सरकारला मान्य असेल असे आश्वस्त करतानाच याप्रश्नी कोणतेही राजकारण केले जात नसल्याचे परब म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test