Type Here to Get Search Results !

भिवडी येथील नेत्र तपासणी शिबीराला ग्रामस्थांचा प्रतिसाद

भिवडी येथील नेत्र तपासणी शिबीराला ग्रामस्थांचा प्रतिसाद
पुरंदर प्रतिनिधी - जनतेच्या आरोग्याची काळजी घेता यावी या उद्देशाने पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व बुधराणी हॉस्पिटल ( के. के. आय.इन्स्टिट्यूट ) यांच्या संयुक्त विध्यमाने भिवडी ( ता.पुरंदर ) येथे घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदरचे उपाध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांच्या वतीने भिवडी येथील राजे उमाजी नाईक स्मारक  ठिकाणी या  नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान या शिबिरात शेकडो नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली असून गरजे नुसार त्यांना मोफत औषधोपचारासह चेष्म्यांचे वाटप देखील करण्यात आले आहे.
या स्तुत्य उपक्रमासाठी कैलास भिंताडे योगेश मोकाशी हनुमंतराव झेंडे ऋषी तिवटे, गौरव पेटकर अमोल चव्हाण ऋषी भिंताडे आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला होता .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test