मु. सा. काकडे महाविद्यालयात भौगोलिक उपकरणांचे प्रदर्शन संपन्न
सोमेश्वरनगर : मु. सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वनगर येथे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भूगोल विभागाने 'भौगोलिक उपकरणांचे प्रदर्शन' शनिवार दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष सतिश काकडे-देशमुख यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे, सहसचिव सतिश लकडे, प्राचार्य प्रा. जवाहर चौधरी व व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य श्री. नितीन कुलकर्णी, अभिजित काकडे-देशमुख, श्री. भीमराव बनसोडे, संजय घाडगे, प्रा. महेंद्र जाधवराव, धोंडीराम आगवणे, प्रा. शिवाजीराव शिंदे, प्रा. बापूराव देवकर, गुलाबराव गायकवाड, प्रा. विलासराव बोबडे, संकेत जगताप,. ऋषिकेश धुमाळ हे उपस्थित होते व त्यानंतर प्रसिद्ध उद्योजक आर. एन बापू शिंदे यांनी प्रदर्शनास भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले. या प्रदर्शनात विविध भौगोलिक व हवामानदर्शक उपकरणे पर्जन्यमापक, तापमापक, आर्द्रतामापक, वायुभारमापक, पॅंटोग्राफ, स्टिरीओस्कोप, जी पी एस, राष्ट्रीय नकाशा संग्रह, दैनंदिन हवामानदर्शक नकाशे, सर्वेक्षण उपकरणे व हवामानदर्शक उपकरणे मांडण्यात आली होती. सर्वांनी या विविध उपकरणांची माहिती घेतली व असे प्रदर्शन वारंवार आयोजित केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जवाहर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागाचे प्रा. कुलदीप वाघमारे व प्रा. नामदेव जाधव यांनी केले.