किशोर मासाळ यांची अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड
बारामती : बारामती (जळोची) येथील युवा नेतृत्व किशोर मासाळ यांची अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. या सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव सुतार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तात्यासाहेब देडे यांनी पिंपरी चिंचवड याठिकाणी ओबीसी शिबीरात मासाळ यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले.
मंडल आयोगाला ज्या प्रवृत्तींनी विरोध केला त्याच प्रवृत्तींचा आज विजय होताना दिसत आहे. अशावेळी सर्व ओबीसींनी वेळ ओळखून त्या प्रवृत्तींना आक्रमकपणे जागा दाखवून देण्याची हिच खरी वेळ असल्याचे मत किशोर मासाळ यांनी निवडीनंतर व्यक्त केले.