शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त करंजेत "सोमेश्वर करंडक २०२१" क्रिकेट सामने संपन्न...
फोटो ओळ - प्रथम क्रमांक पटकावलेल्या पाडेगाव वॉरियर्स क्रिकेट क्लब ला बक्षीस देताना सोमेश्व साखर कारखान्याचे संचालक संग्रामभाऊ सोरटे .
सोमेश्वरनगर - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा मा कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त बारामतीतील सटवाई माळ करंजे मागरवाडी रोड येथे फुल स्पीच टेनिस क्रिकेट सामन्याचे भव्य आयोजन बुवासाहेब हुंबरे मित्र परिवार, सोमेश्वर स्पोर्ट क्लब व प्रणाली शिक्षण संस्था शनिवार दि 11 डिसेंबर कार्यक्रमाचं आयोजन केले होते , राष्ट्रवादी पक्षाचे बारामती तालुकाअध्यक्ष संभाजी होळकर , सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप तर बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या शुभ हस्ते या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे ,श्री सोमेश्वर साखर कारखाना संचालक संग्राम सोरटे,राजवर्धन शिंदे,ऋषिकेश गायकवाड, अभिजित काकडे,शैलेश रासकर, प्रवीण कांबळे,मा संचालक अँड रुपचंद शेंडकर तसेच बारामती दूध संघाचे चेअरमन संजय जगताप ,बारामती नगरसेवक सचिन सातव ,करंजे उपसरपंच बाळासाहेब शिंदे, सदस्य अतुल गायकवाड,मा तंटामुक्त अध्यक्ष संताजी गायकवाड, बारामती सेल तालुका उपाध्यक्ष प्रताप गायकवाड, भाऊसाहेब हुंबरे ,करंजेपूल सरपंच वैभव गायकवाड, मगरवाडी राष्ट्रवादी अध्यक्ष रामभाऊ शेलार, सोरटेवाडी राष्ट्रवादी अध्यक्ष मधुकर सोरटे,चौधरवाडी मा उपसरपंच तानाजी भापकर,बाळासाहेब चौधरी,वाकी सरपंच किसन बोडरे, सदस्य इंद्रजित जगताप ,विक्रम भोसले , आजी माजी सैनिक संघटना मुख्य कार्यध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,पत्रकार संतोष शेंडकर, विनोद गोलांडे इत्यादी सह सोमेश्वर पंचक्रोशी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
या भव्य क्रिकेट सामन्यासाठी विविध जिल्हा तालुक्यातून अनेक क्रिकेट संघाने सहभाग नोंदवत 40 संघांनी खेळ दाखवला,तब्बल सात दिवस चाललेले सामने 17 तारखेला अंतिम सामान्यांची लढत झाली या अंतिम लढत दिवशी प्रथम क्रमांक पाडेगाव वॉरियर्स क्रिकेट क्लब यांनी लाईन्स क्रिकेट क्लब बोरिपारधी यांच्यावर थरारक सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय पटकवत , "सोमेश्वर करंडक २०२१" चे मानकरी झाले तर ,दुसरा - बोरिपारधी लाइन्स क्रिकेट क्लब बोरिपारधी , तिसरा - वाणेवाडी क्रिकेट क्लब,चौथा - गोल्ड स्टार इलेव्हन शिरवळ ,पाचवा - मुर्टी क्रिकेट क्लब या संघांनी आपले स्थान अटीतटीची लढत देत निर्माण केले. झालेल्या सात दिवशीय क्रिकेटच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाज - निखील भोसले वाणेवाडी ,उत्कृष्ट गोलंदाज - अनिल गुरव बोरीपार्धी
, स्पर्धेचे मानकरी - अक्षय वाठारकर पाडेगाव तर
अष्टपैलू खेळाडू - सतीश दिवेकर बोरिपारधी या खेळाडूंना मानचिन्हे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देत गौरवण्यात आले ,
यावेळी प्रथम पारितोषिक सोमेश्वर कारखाना संचालक संग्राम सोरटे यांच्या हस्ते पाडेगाव क्रिकेट क्लब यांना बक्षीस मानचिन्ह देण्यात आले, द्वितीय क्रमांक लायन्स क्रिकेट क्लब बोरिपारधी यांना सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन हुंबरे यांनी करंजेपुल दूरक्षेत्र पी एस आय योगेश शेलार यांच्या हस्ते , तिसरे बक्षीस श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे यांच्या हस्ते वाणेवाडी क्रिकेट क्लब,चौथे बक्षिस बहुजन समाज सेवा संघ करंजे यांनी खजिनदार किशोर हुंबरे,कार्यध्यक्ष विनोद गोलांडे यांच्या हस्ते गोल्ड स्टार इलेव्हन शिरवळ, तर पाचवे क्रमांक बक्षीस किरण शेंडकर यांनी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर यांच्या हस्ते - मुर्टी क्रिकेट क्लब यांना देण्यात आले.
तर सन्मानित खेळाडू तसेच मन्यावरचा सन्मान राजहंस पतसंस्था अध्यक्ष मधुकर सोरटे, चौधरवाडी उपसरपंच तानाजी भापकर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी, वाघाळवाडी उपसरपंच जितेंद्र सकुंडे ,सोमेश्वर करखाना संचालक प्रवीण कांबळे , राष्ट्रवादी विद्यार्थी सेना अध्यक्ष निखिल शेंडकर,करंजे उपसरपंच बाळासाहेब शिंदे ,करंजे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संतोष हुंबरे,वाघळवाडी उपसरपंच जितेंद्र सकुंडे , युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष निखील शेंडकर, चौधरवाडी राष्ट्रवादी अध्यक्ष तानाजी भापकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते पार पडला.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त "सोमेश्वर करंडक 2021" भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते, असेच आयोजन 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जिल्ह्यास्तरिय खो-खो सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे.धडपड एवडीच की तालुक्यातील करंजेगाव मध्ये युवा पीडिला व पंचक्रोशीला प्रेरणादायी स्पर्धा भरल्या जाव्यात. यातुन अनेक खेळाडू तयार व्हावे.
- बुवासाहेब हुंबरे -