Type Here to Get Search Results !

...दीर्घ विश्रांतीनंतर प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरी रस्त्यावर उतरली.

...दीर्घ विश्रांतीनंतर प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरी रस्त्यावर उतरली. 

अखेर २८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बारामती बस स्थानकातून ४ मार्गांवर एसटी बससेवा सुरू

बारामती- सोमेश्वरनगर - एस.टी.महामंडळचे राज्य शासनात विलिनीकरण ही न्यायालयीन लढाई आहे. ती कायदेशीर मार्गाने लढू, असे स्पष्ट करत गेल्या महिनाभरापासून बारामती बस स्थानकात बसलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेत रविवार दि. ५ पासून एसटी सुरु करण्याचा निर्णय घेतला. 

त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरी रस्त्यावर उतरली. रविवारी बारामती आगारातून चार मार्गावर २० बस सुरु करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली.

बारामती आगारातून बारामती ते भिगवण, बारामती – फलटण, बारामती- निरा आणि बारामती ते जेजुरी या शटल सेवा रविवारी सुरु करण्यात आल्या. सोमवार (दि.६) पासून सर्व सेवा पूर्ववत होणार असल्याने गेल्या महिनाभरापासून थांबलेला लालपरीचा प्रवास पुन्हा सुरु होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबली आहे..

सध्या शाळा- महाविद्यालये सुरु असल्याने विद्यार्थ्यांनाही आपली हक्काची एसटी सुरु झाल्याने दिलासा मिळाला आहे. एक महिन्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर बारामतीतून लालपरी धावली. गेल्या महिन्याभरापासून बंद असणारे बारामती आगार रविवारपासून सुरू झाले आहे. सध्या बारामती तालुक्यातील लोकल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच जे आगार सुरू आहे. त्या मार्गावर ही गाड्या सोडणार असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपात बारामती आगार ही सहभागी झाले होते. 

८ नोव्हेंबरपासून आपल्या मागण्यांसाठी बारामती आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता. दरम्यान एसटी बंद असल्याने प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन एसटीचे वरिष्ठ अधिकारी रमाकांत गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांशी वारंवार चर्चा करून, संप मागे घेत कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार रविवारी कर्मचाऱ्यांनी सकारात्मकता दाखवत कामावर रुजू होण्यासाठी सहमती दर्शवली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test