न्यायासाठी लढणाऱ्या योद्धांचा सत्कार सन्मान सोहळा संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु. येथे बौद्ध युवक संघटना समतानगर व सोन्याबापू खोमणे युवा मंच यांच्या वतीने न्यायासाठी लढणाऱ्या योद्धांचा सत्कार सन्मान सोहळा शनिवार दि 4 रोजी संपन्न झाला तर सत्कारमूर्ती म्हणुन उस्मानाबाद जिल्ह्यातील जळीत कांडामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे अँड.अमोल सोनवणे साहेब यांची विशेष सरकारी वकील म्हणुन निवड झाल्याबद्दल व वैभव गीते यांची अनुसूचित जातीतील पीडित १७ कुटूंबियांचे पुनवर्सन करून न्याय मिळवून दिल्याबद्दल या मान्यवरांचा संघटनेच्या वतीने शाल-श्रीफल फेटा पुष्पहार देऊन सत्कार समारंभ करण्यात आला होता..
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वडगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, सुनील भगत- संचालक श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सुनील धिवार - संस्थापक/अध्यक्ष बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य,रणजीत मोरे-संचालक श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना,रवींद्र खोमणे-सरपंच कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायत, सौ.लताताई नलवडे -उपसरपंच कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायत, विश्वास भोसले-अध्यक्ष युवक रिपाई पक्ष बारामती तालुका,नानासाहेब मदने -अध्यक्ष बारामती तालुका बहुजन हक्क परिषद, तसेच पत्रकार हेमंत गडकरी ,योगेश भोसले ,सोमनाथ लोणकर,अॅड बापूसाहेब शिलवंत, अमोल गायकवाड,संतोष डुबल,उमेश गायकवाड,संजय साळवे,इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन महेश चव्हाण.प्रतिक चव्हाण,विश्वजित चव्हाण,सोमनाथ जाधव सोन्याबापू युवा मंच यांनी केले असून
सूत्रसंचालन योगेशजी भोसले तर सोमनाथ जाधव यांनी आभार मानले.