पुरंदर प्रतिनिधी – जेजुरी ते मोरगाव दरम्यान मावडी हद्दीतील वळणदार रस्ता अतिरिक्त डांबराच्या वापरामुळे गुळगुळीत झाला असताना पावसाळी वातावरणात या रस्त्यावर ये - जा करणाऱ्या वाहनांना नेहमीच अपघातास सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे या रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात रस्ता रोको आदोलन छेडणार असल्याचा कणखर इशारा बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य भैय्या टेकवडे यांनी दिला .
मावडी ते जवळार्जुन फाट्या दरम्यान आज ( दि.४ डिसेंबर ) सकाळी साडे दहाच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांचा स्वतंत्र परंतु विचित्र अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत .मात्र या घटनेची माहिती मिळताच अजिंक्य भैय्या टेकवडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त लोकांची विचारपूस करून त्यांना तातडीची वैद्यकीय मदत देखील मिळवून दिली.सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली असली तरी येथील रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची निष्क्रियता उघड झाली आहे.
यावेळी अजिंक्य भैय्या टेकवडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून चांगलेच धारेवर धरत या रस्त्याची दर्जदार दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी देखील केली.परंतु या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात जेजुरी मोरगाव रस्त्यावर रस्ता रोको आदोलन छेडणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी नवनाथ राणे, सुकुमार भामे, महेश भामे, विकास चाचर, अमोल टेकवडे, प्रशांत राणे आदी उपस्थित होते.