विद्यार्थींच्या व शालेय गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार - अध्यक्षा निता कदम दाैंड - शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निता मनाेहर कदम यांची बिनविरोध निवड
कदम वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निता मनाेहर कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीच्या झालेल्या बैठकीच्या प्रसंगी उपस्थित भाऊसाहेब कदम यांनी निता कदम ह्या शालेय व्यवस्थापन समितीच्या जागरुक सदस्या असून त्या प्रत्येक मिटींगला हजर असतात.तसेच त्यांचे शालेय कामकाज व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे सातत्याने बारकाईने लक्ष असते.म्हणून निता कदम यांना संधी दिली पाहिजे असे म्हणताच ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कदम,अजित कदम,सचिन इंगवले, प्रशांत कदम यांनी निता कदम यांच्या निवडीसाठी संमती दर्शवली.व सर्वानुमते निता मनाेहर कदम यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.या वेळी नवनिर्वाचित अध्यक्षा निता कदम म्हणाल्या की,शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी साेडवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या.यावेळी आलेगावच्या ग्रामपंचायतीच्या मा.सरपंच मनिषा कदम व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ माेठया संखेने उपस्थित हाेते.सर्व उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करुन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले.
दाैंड तालुका प्रतिनिधी सुभाष कदम