Type Here to Get Search Results !

गुलाबी थंडी आणि दाट धुके....!

गुलाबी थंडी आणि दाट धुके....!
सोमेश्वरनगर -सध्या वातावरणात दाट धुक्यामुळे गारवा वाढल्यामुळे थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या. रविवार पहाटेपासून सोमेश्वरनगर परिसरात धुक्यामुळे सूर्यदर्शन उशिर होणार आहे.

       गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोमेश्वरनगरसह परिसरातील करंजेपुल, करंजे,चौधरवाडी,देऊलवाडी,मागरवाडी, वाकी, चोपडज,होळ या गावांमध्ये अवकाळी पावसाने जोडपले तर  आज धुक्यामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे. 

 काल पासून सोमेश्वरनगर परिसरातील नागरिकांनी गुलाबी थंडीसोबतच दाट धुके व दवबिंदू अशा मनमोहक वातावरणाचा अनुभव घेतला,तालुक्यासह  या ग्रामीण भागांत सलग दोन दिवस सकाळी सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. पहाटेपासूनच  परिसरात दाट धुके पसरले होते. सोमेश्वरचा गळीत हंगाम चालू असून धुक्यामुळे कारखाना परिसरसह निरा बारामती रस्ता व वाडी वस्ती स्त्यावरील जाणारे रस्तेसुद्धा दिसत नव्हते. वाहनचालकांना रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने  निरा-बारामती या प्रमुख महामार्गांवरील वाहतूक संथगतीने सुरू होती. पंधरा ते वीस फुटांवरील घरे, वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती. त्यामुळे वाहनांचे दिवे सुरू ठेवण्याशिवाय चालकांसमोर पर्याय नव्हता असे रोज सकाळी व्यायामाला  जात असणाऱ्या जेष्ठ नागरीकांनी बोलताना सांगितले. कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोटी पेटवल्याचे चित्र दिसत होते; तसेच वाढत्या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test