...त्या ऊसतोड मजुरांना दिली मायेची ऊब 'सादसंवाद स्वछता ग्रुप'चा स्तुत्य उपक्रम.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर साखर कारखाना यावर्षीचा गळीत हंगाम सुरू असून ऊसतोड मजुर हे विविध जिल्ह्यातुन दाखल झालेले आहेत ...चार दिवसापासून अवकाळी पावसाचे जास्तीचे प्रमाण होते , त्यामुळे कारखाना ऊस तोड कामगार तळावर या मजुरांच्या कोपी , व राहण्यासाठी बांदलेल्या पाली मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने त्यांचे कपडे धान्य व घरगुती इतर सामग्री चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच त्यांना सध्या सोमेश्वर परिसरातील विविध संघटना , सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत त्यांना ज्याच्या त्याच्या परीने किराणा साहित्य वाटप असेल कपडे वाटत असेल अशा विविध स्वरूपाची मदत कार्य चालू आहे .... असे असतानाच आज रविवार दिनांक 5रोजी 'साद संवाद स्वछता ग्रुप' वाणेवाडी (ता बारामती) यांनीसुद्धा सर्व सदस्य एकत्र येत या ऊसतोड मजुरांना कपडे वाटप करण्याचा व त्यांना थोडी मायची उब दिली ,,,साद संवाद स्वछता ग्रुप हा नेहमीच विविध स्वरूपाचे मदतकार्य व अशे उपक्रम राबवत असतो अशी त्यांची ओळखही आहे,तसेच
समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून 'साद संवाद स्वछता ग्रुप' यांनी ऊसतोड मजुरांना कपडे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते गौतम काकडे देशमुख अँँड. नवनाथ भोसले , शशिकांत जेधे देशमुख ,चंद्रशेखर भोसले , दीपक भोसले,निलेश जगताप , कुलदीप शिंदे, सौरभ जगताप,अंकित जगताप,ओंकार जाधव,शुभम जगताप,अथर्व सटाले
आर्यन जगताप,शरद ननावरे,संभाजी खोमणे,नौशाद बागवान तसेच याप्रसंगी गोपाळ चव्हाण यांनी दिलेल्या किराणा किटचेही वाटप करण्यात आले.