इंदापूर ! बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून जंक्शन या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या फलकाचे अनावरण
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - मौजे- जंक्शन, तालुका -इंदापूर, जिल्हा -पुणे या ठिकाणी दिनांक 15 मार्च 2022 बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंदापूर विधानसभेच्या नियुक्तीच्या फलकाचे अनावरण बारामती लोकसभेचे प्रभारी प्रदीपकुमार साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच कांशी तेरा मिशन अधुरा बी एस पी करेगी पुरा, फुले शाहू आंबेडकर के सम्मान में बीएसपी मैदान में अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थित पुणे जिल्हा कोषाध्यक्ष श्रीपती चव्हाण, इंदापूर विधानसभा अध्यक्ष संतोष सवणे, उपाध्यक्ष मनीष कांबळे, कोषाध्यक्ष आनंद फडतरे, महासचिव दीपक सावंत, बामसेफ प्रवीण चव्हाण, बसपाचे कार्यकर्ते कल्याण सवाने, राजेंद्र चव्हाण, साहिल लोंढे, निमगांव केतकी चे सागर शिंदे व इंदापूर तालुक्यातील बहुजन समाज पार्टीचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.