Type Here to Get Search Results !

इंदापूर ! वैभव धाईंजे यांच्या प्रयत्नांना यश, मुंबई उच्च न्यायालयातील ॲट्रॉसिटीच्या अपिलामध्ये विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती

इंदापूर ! वैभव धाईंजे यांच्या प्रयत्नांना यश, मुंबई उच्च न्यायालयातील ॲट्रॉसिटीच्या अपिलामध्ये विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती

इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ : वालचंदनगर इंडस्ट्रीज लि. कंपनीमधील कर्मचारी शिवाजी गोविंद बनसोडे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत बारामती येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयात सुरेश हिप्परकर, राहुल माने, जे के झा, आनंद नगरकर, व्ही.पी.शुक्ला, शैलेश फडतरे या आरोपींवरती गुन्हा दाखल करावा म्हणून न्यायालयात अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी यांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश न्यायालयाकडून पारित झाले होते. परंतु उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी चुकीचा तपास करून चुकीचा ब समरी अहवाल मे.कोर्टात पाठवला होता. त्या अहवालात विरुद्ध शिवाजी बनसोडे यांनी प्रोटेस्ट पिटीशन दाखल केले होते सदर चे प्रोटेस्ट पेटिशन (निषेध याचिका) हे ग्राह्य धरत  बारामती येथील जिल्हा व सत्र विशेष न्यायाधीश यांनी सदर चा अहवाल फेटाळून लावला व शिवाजी बनसोडे यांनी दाखल केलेले प्रोटेस्ट पिटीशन हे ग्राह्य धरले आणि शिवाजी बनसोडे यांनी दाखल केलेली फिर्याद ही मे.कोर्टात आरोपींविरुद्ध सुरू केली. फिर्यादीचे चौकशीचे कामकाज आरोपींविरुद्ध मे.कोर्टाने सुरू केले. सदर अहवाल फेटाळल्यानंतर संबंधित आरोपी यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे क्रिमिनल अपील नंबर ७५८७/२०२१ दाखल केले आहे. शिवाजी बनसोडे हे गेले चार वर्षे नोकरीवर नाहीत. कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर केस दाखल केल्यामुळे त्यांना पगार मिळत नाहीत व त्यांच्याकडे दुसरे कोणतेच उपजीविकेचे साधन नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात काम करण्यासाठी वकील नेमून काम चालविण्यासाठी व वकिलाची फी देण्याची परिस्थिती सुद्धा राहिली नव्हती. अशा काळात त्यांना इंदापूर तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते ॲट्रॉसिटी ॲक्टचे गाढे अभ्यासक मा.वैभव धाईंजे हे भेटले व त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात पिडीत शिवाजी बनसोडे यांना विशेष सरकारी वकील नियुक्ती करण्याची बोलणी केली. व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये पिडीताच्या पसंतीचा वकील विशेष सरकारी वकील नियुक्त करता येतो हे वैभव धाईंजे यांनी शिवाजी बनसोडे यांना सांगितले.वैभव धाईंजे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध वकील ॲड.अनिल कांबळे यांच्याशी संपर्क करून सदरच्या अपिलामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून  काम पाहण्याची विनंती केली की सदरची व्यक्ती ही गरीब आहे.त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही.तरी आपण शिवाजी बनसोडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.ॲड.अनिल कांबळे यांची या अगोदरही तीन केस मध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती.ॲड.अनिल कांबळे यांनी सदर केस मध्ये काम पाहण्याची इच्छा दर्शविल्यानंतर ॲट्रॉसिटी ॲक्टचे गाढे अभ्यासक वैभव धाईंजे यांनी समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, विधी व न्याय विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे, जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी बारामती यांच्याकडे वेळोवेळी गेली सहा महिने पाठपुरावा करून शिवाजी बनसोडे यांना विशेष सरकारी वकील मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.इथून पुढे शिवाजी बनसोडे यांची बाजू ॲड.अनिल कांबळे मुंबई उच्च न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून बाजू मांडतील.
                    महाराष्ट्र राज्यातील ही पहिलीच केस अशी आहे की, ज्या मध्ये उपविभागीय अधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात पीडिताची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test